Avinash Jadhav Resignation Back : मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले. अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. परंतु त्यांचा देखील पराभव झाला होता. दरम्यान, राजीनामा दिल्यास २४ तास उलटत नाहीत तोवर त्यांनी राजीनामा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हा राजीनामा मागे घेत असल्याचं अविनाश जाधव म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष पद आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांनी निवडणूका लढविल्या होत्या. अविनाश जाधव यांनी सुद्धा ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांचा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी पराभव केला होता. या मतदारसंघात अविनाश जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर होते. ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या इतर उमेदवारांचाही पराभव झाला होता. अखेर अविनाश जाधव यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदावरून राजिनामा दिला आहे. राजिनाम्याचे पत्र त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले. परंतु, त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. उलट त्यांना पुन्हा या दोन्ही जिल्ह्यांचं अध्यक्षपद सांभाळण्याचे आदेश देण्यात आले.
याबाबत अविनाश जाधव यांनी एक्सवर म्हटलंय की, “आदरणीय राजसाहेब माझ्या रक्तात आहेत.. राजसाहेबांनी मला ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून असलेली जबाबदारी पाहण्याचा आदेश दिला आहे. आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी राजसाहेबांचा आदेश हा अंतिम असतो आणि त्याचा सन्मान मी नेहमीच आदराने करतो.. मी महाराष्ट्र सैनिक प्रथम, बाकी पद नंतर.”
आदरणीय राजसाहेब माझ्या रक्तात आहेत..
— avinash jadhav (@avinash_mns) December 2, 2024
राजसाहेबांनी मला ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून असलेली जबाबदारी पाहण्याचा आदेश दिला आहे. आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी राजसाहेबांचा आदेश हा अंतिम असतो आणि त्याचा सन्मान मी नेहमीच आदराने करतो.. मी महाराष्ट्र सैनिक प्रथम, बाकी पद नंतर..??
काम करत राहायचं, यश मिळेल तेव्हा मिळेल
अविनाश जाधव माध्यमांना म्हणाले, “काल मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ठाणे पालघरणध्ये एकही जागा निवडून आणली नव्हती. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारत मी राजीनामा दिला होता. माझ्याकडे पक्षात तीन पदे आहेत. पक्षाचं नेते पद आहे, नाभिक सेनेचे अध्यक्ष आहे. आणि ठाणे- पालघर जिल्ह्यांचं अध्यक्षपद आहे. त्यापैकी मी एका पदाचा राजीनामा दिला होता. उर्वरित मी नेता होतोच. मी नेता म्हणून काम करत होतोच. पण राज ठाकरेंनी मला आज बोलावून, आज त्यांनी पुन्हा आदेश दिला की ठाणे पालघर या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे. तुला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायचं आहे. मी राज ठाकरेंच्या प्रत्येक आदेशांचं पालन केलं आहे. आजही त्यांनी जो आदेश दिलाय त्याचं पालन केलंय. राजीनामा वगैरे काही नसतं, असं राज ठाकरे म्हणाले. काम करत राहायचं. यश मिळेल तेव्हा मिळेल, असंही ते म्हणाले. त्यामुळे आजपासून मी दोन्ही जिल्ह्यांचा अध्यक्ष असेन.”
राजीनामा देताना अविनाश जाधव काय म्हणाले होते?
विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथील पराभवाची जबाबदारी घेऊन मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काम करताना माझ्याकडू कळत-नकळत काही चूक झाली असल्यास आपण माफ करवावे असे त्यांनी पत्रात म्हटले होतं.