महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर निशाणा साधला आहे. “काँग्रेस आणि ‘नवाब सेनेत’ आधीच मांडवली झाली आहे,” असा आरोप गजानन काळेंनी केला. तसेच ठाकरे गटाचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा नाही, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांचा होईल,” असा दावा केला. गजानन काळेंनी एक व्हिडीओ जारी करत प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गजानन काळे म्हणाले, “तुम्ही आम्हाला काँग्रेसच्या भारत जोडोला मदत करा, आम्ही तुमच्या शिवतीर्थवरील टोमणे मेळाव्याला मदत करतो असं ठरवून काँग्रेस आणि नवाबसेनेची मांडवली आधीच झाली होती. आता मातोश्री आणि सेनाभवनाबाहेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवतीर्थावरील टोमणे मेळाव्याला बॅनरमध्ये शुभेच्छा दिल्यात. याचाच अर्थ हा टोमणे मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा नाही, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांचा होईल.”

हेही वाचा : “तुम्ही मला आता साधू बनवता का?”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सवाल

“सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाबसेना प्रमुखांना अबु आझमी आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या शुभेच्छांचीही प्रतिक्षा आहे. लवकरच अबु आझमी आणि ओवैसीच्या शुभेच्छा आल्या की शिवतीर्थवरील टोमणे मेळावा कोणत्या विचारांचा होईल हे स्पष्ट होईल,” असं म्हणत गजानन काळेंनी शाब्दिक हल्ला चढवला.