राज्यात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काल (४ जून) संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील सरकार असल्याचे वक्तव्य केले. त्याच वक्तव्यावरुन आता मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर हे सरकार बनवण्याचा प्रस्ताव आणणाऱ्यांच्या पेकाटात लाथ घातली असती, असा घणाघाती हल्ला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे.

हेही वाचा >> इम्रान खान यांच्या हत्येचा कट? पाकिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

“संजय राऊत म्हणतात आताचे सरकार हे बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे.आज बाळासाहेब असते तर हे सरकार बनवण्याचा प्रस्ताव आणणाऱ्यांच्या पेकाटात त्यांनी लाथ घातली असती. हिंदू द्वेष करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीबद्दल बाळासाहेबांनी अनेकदा आसूड ओढले आहेत. लाचार संजय राऊत यांना स्मृतीभ्रंश झालाय,” अशी टीका गजानन काळे यांनी केली.

हेही वाचा >> बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग, २५ कामगारांचा होरपळून मृत्यू, तब्बल ४५० जण जखमी

संजय राऊत काय म्हणाले होते?

चार मे रोजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत झाली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना हे सरकार मान्य नसतं असा दावा विरोधकांकडून केला जातो, यावर आपलं मत काय? असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे अनेकदा व्यासपीठावर एकत्र दिसलेले आहेत. आता जे सरकार आलेलं आहे, ते बाळासाहेबांचं स्वप्न होतं, बाळासाहेबांची भूमिका होती. आज अनेकांकडून गैसरमज निर्माण केला जातोय, त्यांना शिवसेनेचा विचार आणि बाळासाहेबांची भूमिका माहिती नाही,” असे संजय राऊत म्हणाले होते.

Story img Loader