उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली स्थापन झालेल्या ७२ तासांच्या सरकारबाबत केलेल्या विधानामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच अजित पवार आणि मी सरकार स्थापन केलं होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसचे नेते प्रकाश महाजन यांनीही याप्रकरणावर भाष्य करत टोलेबाजी केली आहे.

एबीपी माझाशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, “शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ४५ मिनिट बैठक झाली होती. शरद पवारांना अंधारात ठेऊन अजित पवार देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतात, हे न पचण्यासारखं आणि न पटण्यासारखं आहे. अजित पवार शरद पवारांना न विचारता करतील, यावर कोणाही विश्वास ठेवणार नाही. ही घटना घडल्यानंतर शरद पवारांना वाटलं असेल, मी पावसात भिजून कमवलेले, या घटनेने जाऊ शकतं. म्हणून अजित पवारांना माघारी बोलवलं,” असा टोला प्रकाश महाजनांनी लगावला आहे.

Natasha Poonawalla and Adar Poonawalla
Adar Poonawalla: “माझी पत्नी रविवारी मला…”, अदर पूनावाला यांचाही उपरोधिक टोला; म्हणाले, “आठवड्याला ९० तास काम…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “मैदानच मोकळं…”, सूर्याची बहीण संकटात सापडणार; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, “चुकीचा संदेश…”

हेही वाचा : “अजित पवार सांगण्याचा प्रयत्न करत होते, केंद्रात भाजपाचं सरकार असून…”, भाजपा मंत्र्यांचं मोठं विधान

गद्दार पुन्हा निवडून येणार नाही, असं अजित पवार पिंपरीत बोलताना म्हणाले. याचाही प्रकाश महाजन यांनी समाचार घेताल. “अजित पवारांनी शरद पवारांना न विचारता देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतली, तर ते गद्दार आहेत. अजित पवार खरच गद्दार असते, तर शरद पवारांनी त्यांना माफी देऊन उपमुख्यमंत्री केलं नसतं.”

हेही वाचा : “लग्न लावायचं गंगूशी अन् संसार…”, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावरून आंबेडकरांचा शरद पवारांना टोला

देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत, असं विधान शरद पवारांनी केलं होतं. यावर बोलताना प्रकाश महाजनांनी म्हटलं, “याचा अर्थ याच्यामागे काहीतरी घडलं. ते घडलेलं सत्य जगासमोर येऊन नये, किंवा दोन व्यक्तीत झालेल्या गोष्टी कालांतराने पुढं आणणं योग्य नाही. असं शरद पवारांना सूचवायचं होतं.”

Story img Loader