मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हर हर महादेव या चित्रपटासाठी आवाज दिला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे राज ठाकरे यांची मुलाखत घेत आहे. या मुलाखतीत राज ठाकरे चित्रपट, चित्रपट निर्मितीची प्रक्रिया यावर आपले मत व्यक्त करत आहेत. तसेच राज ठाकरे या मुलाखतीत आपल्या वेगवेगळ्या अनुभवांवरही बोलत आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वरराज या नावाबद्दल सविस्तर सांगितले आहे.

हेही वाचा >>> आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या रमेश केरेंचे शरद पवारांना मेसेज, खुद्द पवारांनीच सांगितलं; म्हणाले…

मला हर हर महादेव या चित्रपटाला आवाज देण्याची संधी दिली त्यामुळे धन्यवाद. माझ्या वडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी संगीतात काहीतरी करेन अशी अपेक्षा त्यांना होती. त्यांनी माझ्याकडून अनेक वाद्ये वाजवून घेण्याचा प्रयत्न केला. मी स्वरराज नावाने व्यंगचित्र करायचो. मात्र मला एके दिवशी ‘मी बाळ ठाकरे नावाने सुरुवात केली, तू राज ठाकरेने सुरुवात करायची,’ असे मला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना माझे दुसरे बारसे झाले, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ‘रूपया घसरत नाहीये’ म्हणणाऱ्या अर्थमंत्र्यांना सुप्रिया सुळेंनी करुन दिली सुषमा स्वराज यांची आठवण, म्हणाल्या…

मी पहिल्यांदा २००३ साली पहिल्यांदा व्हाईस ओव्हर दिला होता. व्हाईस ओव्हर देणं हे माझे काम नव्हते. किंवा मी त्याचा विचारही केला नव्हता, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

Story img Loader