“२३ मार्चपासून देशात लॉकडाउन आहे. सुरूवातीच्या काळात कोणाला करोनाच्या संकटाचा अंदाज नव्हता. आज जेव्हा आपण आकडेवारी पाहतो तेव्हा परिस्थितीत समजते. परंतु आपल्याकडे लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असं परखड मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. आपण आता लॉकडाउन किती काळ चालवणार आहोत. लोकांना आपली नोकरी आहे की नाही याबाबतहबी शंका आता निर्माण झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॉकडाउन आणि अनलॉकवर टीका केली.
आणखी वाचा- “डब्ल्यूएचओ काही माझ्याकडून सल्ले घेत नाही”; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
“आपल्याकडे पोलीस, डॉक्टर्स, अत्याव्यश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांनी खुपच चांगलं काम केलं. आजची करोनाबाधितांची संख्या प्रश्नचिन्ह निर्माण करत. १३० कोटींच्या देशांच्या आतापर्यंत १३ लाख रुग्ण झाले असं म्हणतो. काही लोकांचा यात मृत्यू झाला हे दुर्देव म्हणायचं. आपण लॉकडाउन वगैरे किती काळ चालवणार आहोत. आज लोकांकडे आपलं काम आहे की नाही ही शंका आहे. पुण्यात तर दुकानं विक्रीला ठेवलेल्याचं फोटोही मी पाहिले आहेत,” असं राज ठाकरे म्हणाले.
आणखी वाचा- उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे
“काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत मी अनलॉक कधी करणार हे विचारलं होतं. त्याचं उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. सरकारनं नियमांप्रमाणे दुकानं सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सांगितली आहेत. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं आहे. ते सहा वाजेपर्यंत कामावर आहेत. तर त्यांनी मग सामान घ्यायला कधी जावं. एक दिवस एका फुटपाथवरची दुकानं सुरू ठेवायची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणची उघडी ठेवायची. लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.