Raj Thackeray on D. Gukesh becomes youngest-ever world champion: भारताचा बुद्धिबळपटू दोम्माराजू गुकेश याने वयाच्या १८ व्या विश्वविजेता होण्याचा मान पटकावलाय. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवला. दरम्यान, डी. गुकेशच्या या कामगिरीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने आज शब्दशः इतिहास घडवला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याचं, त्याच्या कुटुंबीयांचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनःपूर्वक अभिनंदन. कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा हा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे आणि जगजेत्यांची एक मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण होऊ दे हीच इच्छा”, असं म्हणत राज ठाकरेंनी डी. गुकेशचं कौतुक केलंय.

गुकेश आणि डिंग यांनी गुरुवारी सामन्याच्या अंतिम डावात प्रत्येकी ६.५ गुणांसह बरोबरी साधली. १४व्या डावात, ज्यात डिंग पांढऱ्या सोंगट्यासह खेळत होता, तो सामन्याच्या ५३व्या चालीत डिंगने चूक होईपर्यंत अनिर्णित दिशेने वाटचाल केली होती. गुकेशने खेळत राहत डिंगवर दबाव आणणं सुरू ठेवलं आणि यात गतवर्षीचा विश्वविजेता लिरेन फसला.

हेही वाचा >> D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास

जिंकल्यानंतर डी गुकेश काय म्हणाला?

ि

लिरेन आणि गुकेश यांच्यातील अंतिम डावातील सामना ही ड्रॉ हो”ण्याच्या मार्गावर होता पण डिंगच्या हातून मोठी घोडचूक घडली आणि त्याच्या हातातून सामना निसटला. डी गुकेश या ऐतिहासिक विजयानंतर म्हणाला, “सामन्यात जेव्हा मला कळलं की लिरेनने घोडचूक केली आहे, तो माझ्या जीवनातील खूप आनंदाचा क्षण होता. आपल्या सर्वांनाच माहितीय की लिरेन उत्कृष्ट खेळाडू आहे. तो बुद्धिबळच्या इतिहासातील एक उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे. त्याने या सामन्यादरम्यान किती दबाव झेलला आणि शेवटपर्यंत हार न मानता दाखवून दिलं की खरा चॅम्पियन कसा असतो. माझ्यासाठी तो खरा विश्वविजेता आहे. मी जो क्षण अनुभवतो आहे तो अनुभवण्याचं प्रत्येक बुद्धिबळपटूचं स्वप्न असतं आणि आज मी माझं स्वप्न जगतो आहे. सर्वात आधी देवाचे खूप आभार.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader raj thackeray post for d gukesh becomes youngest ever world champion sgk