कल्याणमधील मनसेचे प्रदेश सचिव इऱफान शेख यांनी गुरूवारी मनसेच्या सदस्यत्व आणि प्रदेश सचिव पदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. या इशाऱ्यावरून शेख नाराज झाले होते. तशी नाराजी त्यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त केली होती. दोन दिवसांपूर्वीच्या ठाणे येथील सभेत राज यांनी भोंगे हटविण्याची अंतिम मुदत दिल्याने या गुंत्यात अडकणे नको असा विचार करून शेख यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा मार्ग पत्करला.

पुणे: मनसे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा; वसंत मोरेंची हकालपट्टी आणि मशिदीच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेमुळे नाराजी

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

शेख यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठवून दिला. पक्षाच्या कल्याण जिल्हा, राज्य पातळीवरील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पाडल्या. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत मनसेला सर्वाधिक जागा मिळवून देण्यात शेख यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मनसेच्या अनेक आंदोलनात अग्रभागी राहून अनेक गुन्हे अंगावर घेतले. न्यायालयात फेऱ्या मारल्या. मराठी पाट्या आंदोलनात पोलिसांचा सुज येईपर्यंत मार खाल्ला. पक्षासाठी कधी हे दुख जाहीर केले नाही, अशी खंत शेख व्यक्त करतात.

“मनसेच्या याच खेळींना वैतागून मी पक्ष सोडला,” वसंत मोरेंना पदावरुन हटवल्यानंतर रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप

अनेक मुस्लिम बांधव मनसेचे कार्यकर्ते होते. राज यांनी भोंगे हटविण्याची भूमिका घेतल्यापासून स्थानिक कार्यकर्ते, मुस्लिम बांधवांनी शेख यांना जाब विचारण्यास सुरूवात केली होती. आपण पक्षाशी निष्ठेने राहून हेच फळ मिळाले का अशी सडेतोड विचारणा समाज, कार्यकर्त्यांकडून शेख यांना होत होती.

काही दिवसापूर्वी त्यांनी भावनिक होऊन एक मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ‘आमच्या भावना कठे व्यक्त करायच्या. आता समाजाला सामोरे कसे जायाचे? १६ वर्षाचा मागील इतिहास आठवला आणि डोळ्यात पाणी आले’, या भावनिक मजकुराची सोशल मीडियावर खूप चर्चा होती. नाराज होऊनही वसंत मोरे यांच्यासारखी भेट राज यांनी शेख यांना दिली नव्हती किंवा त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नव्हता.
अनेक गोरगरीब, गरजू विद्यार्थी मदरशांमध्ये शिक्षण घेतात. हे जर राज यांनी आम्हाला विचारले असते तर आम्ही त्यांना पटवून सांगितले असते. असे मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी सांगितले. पक्षातील एक अभ्यासू कार्यकर्त्याला मुकलो अशा भावना मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

राजीनामा पत्र

“पक्ष स्थापनेपासून काम करत आहे. पक्षनिष्ठेला बांधिल राहून दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व भेद विसरून पार पाडल्या. अनेक आंदोलनात अग्रभागी राहून नेतृत्व केले. पोलिसांनी हिरवे निळे होईपर्यंत मारले. आपण या जखमा विसरायच्या नाहीत, बाकी मी बघतो असे आपण म्हणाला होता. आता आम्ही काय बघत आहोत. समाजात कुचंबणा, पक्षात अस्थिर वातावरण. १६ वर्षानंतर आपणास अचानक अजान, मशिद, भोंगे, मदरसे यांची आठवण आली. आम्ही तुमच्या सोबत खंदे समर्थक म्हणून असताना तुम्ही आम्हाला याविषयी बोलला असता तर आम्ही याचा सोक्षमोक्ष केला असता,” असे शेख यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Story img Loader