शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यातील गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्लाची सुपारी श्रीकांत शिंदेंनी दिल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. अशातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना पत्र लिहलं आहे. या पत्रानंतर देशपांडेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संदीप देशपांडे म्हणाले की, “संजय राऊतांच्या काळजीपोटी पत्र लिहलं आहे. संजय राऊतांनी कंगणा रणौतला नॉटी म्हटलं होतं. तसं मलाही ते नॉटी म्हणू शकतात, हरकत नाही. मला माझ्या भावना व्यक्त करणं गरजेचं होतं. संजय राऊतांच्या भाषेतच पत्र लिहलं आहे. काही दिवसांनी जो बायडेन, पुतीन, चार्ल्स एकमेकांना फोन करुन विचारतील हे संजय राऊत कोण आहे. तसं काही व्हायला नको, म्हणून काळजीपोटी पत्र लिहलं आहे.”

संजय राऊतांनी हल्ला होण्याचा आरोप केला आहे, याबद्दल विचारलं असता संदीप देशपांडेंनी सांगितलं, “आपल्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्या की, माणसाला काही भास व्हायला लागतात. स्किझोफ्रेनियाच्या या आजाराच्या पहिल्या टप्प्यात माणसाला मला कोणतरी मारत आहे, पाण्यात बुडवत आहे, रेल्वेखाली ढकलत आहे, असा भास होतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्राला नव्हे तर देशाला संजय राऊतांची गरज आहे,” असा खोचक टोला संदीप देशपांडेंनी लगावला आहे.