मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपाने तर मुंबई पालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी सभा, बैठका यांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. असे असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. २३ जानेवारी रोजी करोना काळातील सर्वात मोठा घोटाळा समोर आणणार आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
हेही वाचा >>>पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष विनंत्या, शिफारशींमुळे आले मेटाकुटीला; म्हणाले, “कृपया…!”
“एक व्यक्ती शाखेत आली. त्या व्यक्तीने काही कागदपत्रं आणि पेन ड्राईन शाखेत दिली. त्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाहीत. मात्र मी तो पेन ड्राईव्ह पाहिला, कागदपत्रं पाहिली. विरप्पन गँगने करोना काळात मुंबईची लूट केली. या लुटीचे ढळढळीत पुरावे या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. सोमवारी २३ जानेवारी रोजी आम्ही हे सगळं माझ्यमांसमोर मांडणार आहोत. तसेच पोलिसांत तक्रारही देणार आहोत,” असे संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा >>> शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना धमक्या? नर्स संघटनेचा गंभीर आरोप!
दरम्यान, भाजपानेदेखील मुंबई पालिकेतील व्यवहारावर आक्षेप घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी करोना काळात ठाकरे गटातील नेत्यांनी मोठे आर्थिक घोटाळे केले आहेत, असा आरोप केलेला आहे. असे असतानाच संदीप देशपांडे २३ जानेवारी रोजी नेमका कोणता घोटाळा समोर आणणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.