ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सडकून टीका केली आहे. “आदित्य ठाकरेंचा स्वत:वर आणि उद्धव ठाकरेंवर विश्वास उरलेला नाही की त्यांचे चेहरे बघून येथील लोक मतदान करतील. एका काळ असा होता की शिवसेनाप्रमुखांच्या नावावर मतं मिळायची. आता जर तुम्हाला तेजस्वी यादवांना आणावं लागत असेल, तर तुमची काय अवस्था झालीय हे एकदा आरशात बघा”, असा घणाघात संदीप देशपांडेंनी केला आहे.

“ही केवळ लाचारी”, आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरुन नरेश म्हस्केंचं टीकास्र; म्हणाले, “ज्यांनी बाळासाहेबांना…”

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

तेजस्वी यादवांना मुंबई महापालिका निवडणुकीत आणण्यासाठी त्यांची भेट घेतली जात आहे, अशी चर्चा असल्याचं देशपांडेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेसह महाविकासआघाडीचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

आत्महत्या, बलात्कार आणि खुनाचे गंभीर आरोप, आता सीबीआयने सांगितलं दिशा सालियनच्या मृत्यूचं नेमकं कारण

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबाबत शिवसेनेकडून एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हा दौरा सदिच्छा भेटीसाठी असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरेंसोबत खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदींसह काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

“…तर तोंडाची थुंकी का उडवत होता”, दिशा सालियान प्रकरणावरून संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीदेखील टीकास्र सोडलं आहे. “ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब होते, त्यांना जाऊन आदित्य ठाकरे भेटत आहेत. त्यांच्यावर ही काय वेळ आली आहे… ही केवळ लाचारी आहे”, अशा शब्दात म्हस्केंनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा समाचार घेतला आहे. उत्तर भारतीयांमध्ये सहानभुती निर्माण करण्यासाठी हा दौरा असल्याचेही म्हस्के यांनी म्हटले आहे.