शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीचे अधिकारी रविवारी (३१ जुलै) सकाळी सात वाजताच राऊतांच्या मैत्री या बंगल्यावर आले असून छापेमारी सुरु आहे. ईडीच्या या चौकशीनंतर त्यांना अटकही केले जाऊ शकते. राऊतांवरील ही कारवाई सूडबुद्धीतून केली जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र ईडीच्या या कारवाईचे समर्थन केले असून राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतांना आता कोणताही पक्ष घेणार नाही. त्यांनी आता भिंतीकडे तोंड करून बोलण्याची सवय करून घ्यावी, असा टोला देशापांडे यांनी लागवला आहे.

हेही वाचा >>> संजय राऊतांवरील ईडी कारवाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “देशातील कोणत्याही व्यक्तीची चौकशी…”

“कोणत्याही पक्षात दोन लोक असतात. काही लोक पक्षाचे असेट असतात तर काही लोक पक्षाचे लायेबलिटी असतात. संजय राऊत हे शिवसेनेचे असेट नाही तर लायेबलिटी आहेत. आता संजय राऊत शिवसेना पक्ष सोडतो म्हणाले तरी त्यांना आता कोणताही पक्ष घेणार नाही,” असा दावा संदीप देशपांडे यांनी केला.

हेही वाचा >>> ईडी कारवाईवरुन नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “सगळ्यांची सकाळ खराब करणारे…”

तीन महिन्यांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राऊतांविषयी एक विधान केले होते. ज्यांना कॅमेऱ्याकडे पाहून बोलायची सवय आहे, त्यांनी आता भिंतीकडे पाहून बोलण्याची सवय लावावी, असे राज ठाकर म्हणाले होते. आत ती वेळ आली आहे. त्यांना भिंतीकडे बोलायची सवय हळूहळू होईल,” अशी बोचरी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> विश्लेषण : राऊतांच्या संपत्तीवर जप्ती आणणारं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा?

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. आता या चौकशीला सहा तासापेक्षा अधिक काळ झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर अटकेची टागंती तलवार कायम आहे.

Story img Loader