राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. यानंतर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. या निकालानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ” टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले,” असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन उमेदवार मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. भाजपाने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवत मोठी खेळी खेळली होती. महाडिक यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीसह शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 

“हे मान्य केले पाहिजे की, देवेंद्र फडणवीसांना…”; शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान, धनंजय महाडिक यांचा विजय झाल्याचे निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर पहाटे चार वाजल्यापासूनच कोल्हापुरात महाडिक व भाजपा समर्थकांनी जल्लोष सुरू केला. तर महाडिक यांचे कुटुंब या आनंदात सहभागी झाले होते. धनंजय महाडिक यांच्या विजयामुळे महाडिक घराण्याला उमेद मिळाल्याचा आनंद कुटुंबीयांनी व्यक्त केला.

“आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय”; संभाजीराजेंच्या समर्थकांचा शिवसेनेला टोला!

 राज्यसभेच्या सहाव्या जागेचेची लढत ही धनंजय महाडिक व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार या कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये होणार होती. काल सकाळपासूनच निवडणूक प्रक्रियाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मतमोजणी लांबली तरी कार्यकर्ते रात्रभर टीव्हीवरील बातम्यांकडे लक्ष ठेवून होते. पहिल्या पाच उमेदवारांचा निकाल लागल्यानंतर सर्वांच्या नजरा सहाव्या जागेकडे लागल्या होत्या.