काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. गणपतीच्या निमित्ताने राज ठाकरे सहकुटुंब वर्षा निवासस्थानी गेले होते. त्यात आता आणखी एका मनसेच्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवसस्थानी हजेरी लावत, त्यांची भेट घेतली. गणपती दर्शनासाठी ही भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संदीप देशपांडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. संतोष धुरी, शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकरही तेव्हा उपस्थित होते.

हेही वाचा – “दसऱ्याच्या आधी याकूबच्या कबरीला…”, मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान; म्हणाले, हिंदूत्ववादी कधी…”

शिंदे गट-मनसे एकत्र लढणार?

मुंबई महापालिका, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकतो. त्यात मनसे नेत्यांचं ‘वर्षा’वर येणं जाणं वाढलं आहे. गणपती दर्शन हे कारण असलं तरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट-मनसे एकत्र लढणार का, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader sandeep deshpande meets cm ekanth shinde in varsha over ganpati darshan ssa