महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर मनसे-ठाकरे गटाची युती होण्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. अभिजीत पानसे राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबाबतचा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांना भेटल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि अनेक खासदारांना बरोबर घेत नवा गट स्थापन केला. तसेच शिवसेनेचं चिन्ह आणि नावही मिळवलं. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे. ३० हून अधिक आमदार आणि खासदारांना बरोबर घेऊन अजित पवार यांनी वेगळा गट बनवला आहे. या गटाने पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला आहे. राज्यातल्या राजकारणाचा चिखल झाला असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता एकत्र यावं अशी जनसामान्यांची इच्छा असल्याचं चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
“आम्ही दोन वेळा प्रस्ताव…”, राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर मनसे नेत्यांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून होत आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-07-2023 at 15:35 IST
TOPICSउद्धव ठाकरेUddhav ThackerayमनसेMNSराज ठाकरेRaj ThackerayशिवसेनाShiv Senaसंदीप देशपांडेSandeep Deshpande
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader sandip deshpande answers will raj and uddhav thackeray come together asc