शिवसेना ( शिंदे गट ) नेत्या दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र निवनिर्माण सेनेवर टीका केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम हाती घ्यावी, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला. याला मनसे नेते संतोष धुरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सय्यद यांनी या पक्षातून त्या पक्षात फिरत फुकटची भाकरी खावी, असं टीकास्र संतोष धुरी यांनी सोडलं आहे.
दीपाली सय्यद काय म्हणाल्या?
ट्वीट करत दीपाली सय्यद यांनी म्हटलं, “मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी. राज्यभरात जेवढे मनचेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! दोन दिवसाचे काम, उगाच जेलमध्ये महिनाभर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पन! युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा!.”
हेही वाचा :“खुनाचा आरोप होताच, राज ठाकरे फरार”, स्वत:च सांगितला जुना प्रसंग, म्हणाले…
“…त्यावर मनसेची लाथ पडणारच”
यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संतोष धुरी म्हणाले, “सत्तेची भाकरी खाण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात फिरत आहात. फुकटची भाकरी मिळतेय, ती खावी. आम्हाला त्याचं काही देणं-घेणं नाही. कुणावरही अन्याय होत असेल, तर त्यावर मनसेची लाथ पडणार. दीपाली सय्यद यांनी आपलं काम करावे. आम्ही आमचं काम करतोय.”
हेही वाचा : रोहित पवारांचा फडणवीसांना इशारा; म्हणाले, “युवा वर्ग संतापला तर सरकारला..”
“…ही मनसेची दहशत होती”
“मुंबईतील रस्त्यांची दुर्दंशा झाली होती, तेव्हा संबंधित लोकांना रस्त्यातील खड्ड्यात आम्ही उभं केलं होतं. त्यासाठी आम्ही ८ दिवस जेलमध्ये सुद्धा गेलो होतो. नंतर तातडीने मुंबईतील रस्ते दुरुस्त झाले होते. ही मनसेची दहशत होती,” असं संतोष धुरी यांनी म्हटलं.