वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे कायम चर्चेत राहणारे नेते. आपल्या खळ्ळ-खट्याळ स्वभावामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या राज ठाकरेंच्या आदेशाला विरोध केल्याने वसंत मोरे राज्यभर चर्चेचा मुद्दा बनले होते. त्यात आता वसंत मोरेंचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते चंद्रा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

वसंत मोरे यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये ते गणपतीच्या विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभारून डान्स करताना दिसत आहे. चंद्रमुखी सिनेमातील अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा या गाण्यावर वसंत मोरे डान्स करत आहेत. तसेच, यामध्ये ते हाताने बाण सोडतानाचा हावभाव करत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांच्या प्रतिक्रियाही या व्हिडिओवरती येत आहे.

दरम्यान, कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. मात्र, यंदा मुंबई, पुणे यासोबत महाराष्ट्रात गणरायाचे थाटामाटात आगमन झाले. तर, शुक्रवारी गणेश विसर्जन मिरणुकीचा भक्तांनी मनमुराद आनंद लुटला. ढोल, ताशा, डीजेच्या गजरात गणरायाला अखेरचा निरोप देण्यात आला.

Story img Loader