शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी होऊन पक्षात उभी फूट पडली. यानंतर बदललेली राजकीय परिस्थिती पाहता राज्यात काही ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी आता तरी एकत्र यावं असे बॅनर लागले आहेत. यानंतर गुरुवारी (६ जुलै) मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पानसे हे युतीचा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांकडे गेले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत पानसे आणि संजय राऊतांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना राजू पाटील म्हणाले, “मनसे नेते अभिजीत पानसे आणि संजय राऊत यांचे पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. पानसे यांनी अलीकडेच ‘ठाकरे’ चित्रपट काढला होता. मला वाटतंय, आता नवीन एखादी स्क्रीप्ट आली असेल त्यामुळे ते संजय राऊतांशी चर्चा करण्यासाठी गेले असावेत.”

uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
What Aditya Thackeray Said?
Aditya Thackeray : “…तर आम्हीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करु”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर असं का म्हणाले आदित्य ठाकरे?
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

हेही वाचा- “अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवार हसून एकच वाक्य बोलले, ते म्हणजे…”, रोहित पवारांचा खुलासा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होईल का? असं विचारलं असता राजू पाटील पुढे म्हणाले, “मला नाही वाटतं की युती होईल. कारण ही युती व्हावी, अशी मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची पण इच्छा असली पाहिजे. समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटत आहे. त्यांच्याशी युती करायची माझी अजिबात इच्छा नाही. फक्त ते अडचणीत आहेत म्हणून आम्ही युती का करावी?”

हेही वाचा- “…यामुळे भाजपाच गोत्यात जाणार”; बच्चू कडूंचं थेट विधान, खदखद व्यक्त करत म्हणाले…

“आमचे नेते राजसाहेब अडचणीत असताना आणि त्यांच्या घरी कौटुंबीक प्रसंग घडला असताना तुम्ही (ठाकरे गट) आमचे नरसेवक फोडले. आता तुमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? आम्ही आतापर्यंत कुणाशीही युती केली नाही. यापुढेही करू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझं हे मत मनसैनिक म्हणून आहे, मनसेचा नेता म्हणून नाही,” असंही राजू पाटील म्हणाले. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Story img Loader