परभणी शहरामध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास परभणीचे मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणाची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन पाटील हे यांची किरकोळ वादातून हत्या करम्यात आल्याचं संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र खरोखरच यामागे काय कारणं आहे याचा तपास पोलीस करत आहेत. सचिन पाटीलच्या मित्रानेच या हत्याकांडाचा कट रचल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नवा मोंढा पोलीस स्थानकामध्ये सचिन पाटील यांच्या हत्येप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सचिन पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांचे फोन कॉल रेकॉर्ड्स तपासले जात असून पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल आणि आरोपी आमच्या ताब्यात असेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सचिन पाटील यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. कर्त्या मुलाची हत्या झाल्याने या प्रकरणाची कसून चौकशी करुन दोषींना ताबडतोब अटक करावी अशी मागणी सचिनच्या कुटुंबियांनी केली आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा केली जावी असंही कुटुंबाने म्हटलं आहे.