Raj Thackeray Meet CM Eknath Shinde : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. यातच अनेक नेते राज्यातील विविध मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाऊन पक्षाच्या कामाचा आढावा आणि आगामी विधानसभेची रणनीती आखत आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षाच्या कामाचा आढावा आणि उमेदवारांची चाचपणी करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्ष संघटनेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात करत राज्यभरात दौरा केला आहे. या दौऱ्यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी काही उमेदवारांची देखील घोषणा केली आहे.

यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (२३ सप्टेंबर) मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोडून राज ठाकरे यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी घेतलेल्या या अचानक भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत जवळपास आर्धा तास चर्चा झाली आहे. मात्र, या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? कोणती राजकीय चर्चा झाली? आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही चर्चा झाली आहे का? असे अनेक सवाल आता राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : Amit Thackeray : आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवणार का? अमित ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले, “जिकडे गरज असेल तिकडे…”

शिवतीर्थावर मनसे नेत्यांची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज (२३ सप्टेंबर) बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना देणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीबाबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचा आढावा आणि कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदावारी द्यायची? विधानसभेच्या किती जागा लढवायच्या? यासंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

भेटीत काय चर्चा झाली?

दरम्यान, राज ठाकरे यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आगामी विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची आज अचानक भेट घेतल्यामुळे पडद्यामागे नेमकी काही घडामोडी घडत आहेत का? मुंबईतील विधानसभा मतदारसंघाबाबत काही चर्चा या भेटीत झाली आहे का? असे अनेक सवाल विचारले जात आहेत. मात्र, असं असलं तरी या भेटीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत राज्यातील विविध विकास कामांबाबत चर्चा झाल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader