Raj Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरच्या दिवसाकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यभरात विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचंही पाहायला मिळत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील वरळी मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरचे भोंगेंच्या विषयावरून मोठं भाष्य केलं आहे. “सत्ता हातात द्या, पहिल्या ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा