मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अलीकडेच मंजूर केला. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. आज अखेर केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ नामकरण करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे. त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार… परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य!” असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Raj Thackeray refrained from criticizing Aditya Thackeray in the Worli meeting Mumbai
वरळीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा नामोल्लेखही नाही! राज ठाकरे यांनी टीका करणे टाळले
Jammu Kashmir Assembly Chaos
Chaos in J&K Assembly : जम्मू काश्मीरच्या विधानसभेत आमदार भिडले; कलम ३७० च्या मुद्द्यावरून सभागृहात घमासान!
Process of house sale by developer without lot Mumbai news
सोडतीविनाच विकासकाकडून घरविक्रीची प्रक्रिया?
accused absconded from Ajani police station
नागपूर : आजनी पोलीस ठाण्यातून आरोपी पसार
Gold silver and cash were also seized before assembly election 2024 in amravati
अमरावती : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचा महापूर! सोने, चांदीसह रोकडही…

हेही वाचा- महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…

खरं तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

हेही वाचा- मोठी बातमी: औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामकरणाला केंद्र सरकारची मंजुरी

पण यानंतर राज्यात सत्तांतर घडलं. पुढे शिंदे-फडणवीस सरकारने उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावाला स्थगिती दिली. औरंगाबाद शहराचं नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याचा नवा प्रस्ताव मंजूर केला. यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. अखेर आज या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.