MNS Sabha in Shivaji Park : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर १७ नोव्हेंबर रोजी कोणत्या राजकीय पक्षाची सभा होणार याचा निर्णय नगर विकास विभागाकडू घेण्यात येणार हता. मुंबई महापालिका प्रशासनाने याबाबतचा अहवाल नगर विकास विभागाकडे पाठवला असून अंतिम निर्णय सरकार घेणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु, सरकारने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. परिणामी राज ठाकरेंनी येथील सभाच रद्द केली आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करण्याकरता राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही घोषणा केली.

राज ठाकरे म्हणाले, “१७ तारखेच्या सभेसाठी सरकारकडून परवानगी आलेली नाही. दीड दिवस त्या सभेकरता उरलेला आहे. दीड दिवसांत या सभा करणं कठीण होऊन बसतंय. त्यामुळे १७ तारखेची सभा करत नाहीत. त्याऐवजी मुंबई ठाण्यातील मतदारसंघात दौरा सुरू होणार आहे.”

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: दिल्लीत अजित पवार-शरद पवार भेट; युगेंद्र पवार म्हणतात, “एकत्र येण्यासाठी प्रयत्न…”
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

शिवाजी महाराज पार्क मैदानात प्रचार सभा घेण्याच्या परवानगीकरीता मुंबई महानगरपालिकेकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना  शिवसेना (उद्धव ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे) या तिन्ही पक्षांनी अर्ज केले आहेत. निवडणुकीचा प्रचार १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता संपणार असून आदल्या दिवशी १७ नोव्हेंबर रोजी शेवटची प्रचार सभा राजकीय पक्षांना घेता येणार आहे. त्यामुळे या एका दिवसासाठी राजकीय पक्षांचे अर्ज आले असून तीनही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लागली.

हेही वाचा >> MNS Manifesto : मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; मूलभूत गरजांपासून मराठी अस्मितेच्या मुद्द्यांना घातला हात

पहिला अर्ज मनसेचाच

विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मतदानाला काही दिवस उरले असून प्रचाराला वेग आला आहे आणि राजकीय वातावरणही तापले आहे. येत्या काही दिवसात मुंबईत राजकीय पक्षांतील मोठ्या नेत्यांच्या राजकीय सभांचा धुरळा उडणार आहे. सभांच्या आयोजनासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेकडे गेल्याच महिन्यात अर्ज केले आहेत. मात्र १७ नोव्हेंबरच्या सभेसाठी अद्याप निर्णय न झाल्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे या पक्षांनी पालिकेला पुन्हा स्मरणपत्रे पाठवली आहेत. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. ज्या पक्षांचे अर्ज आले आहेत त्यांच्या निवेदनासह परवानगीचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला असून नगर विकास विभागच त्यावर निर्णय घेणार आहे. या परवानगीसाठी पहिला अर्ज मनसेने केल्याचा दावा या पक्षाने केला होता. त्यामुळे आता नक्की कोणाला परवानगी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, शिवाजी पार्क मैदानावर सभा किंवा कार्यक्रम घेण्यासाठी मैदान आरक्षित करण्याकरीता सर्वोच्च न्यायालयाने ४५ दिवसांची मर्यादा घालून दिली आहे. ही मर्यादा संपल्याची चर्चा असून कोणालाही १७ नोव्हेंबरला मैदान देता येणार नसल्याची चर्चा आहे. मात्र महायुतीतील घटक पक्षांनी १०, १२ नोव्हेंबरसाठी मैदान आरक्षित केले होते, पण तेथे सभा झाली नाही. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी मैदान उपलब्ध होऊ शकणार असल्याचे समजते.

Story img Loader