महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित झाला. सामनाच्या पॉडकास्ट साठी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीवर भाजपाने जोरदार टीका केली आहे. फिक्स्ड मॅच वगैरे म्हणत भाजपाने या पहिल्या भागावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अनोख्या पद्धतीने मुलाखतीला मुलाखतीनेच उत्तर दिलं आहे. हा व्हिडीओ ट्वीट करुन उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

काय आहे संदीप देशपांडेंनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत?

एक ज्वलंत आणि स्फोटक मुलाखत असा चिरका आवाज येतो आणि मुलाखत सुरु होते. संतोष धुरी हे संजय राऊत यांच्या वेशात दिसतात तर संदीप देशपांडे उद्धव ठाकरेंच्या. त्यापुढे हा संवाद कसा चालतो वाचा.

Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Raj Thackeray on chhava movie Video
Raj Thackeray: “छत्रपती संभाजी महाराजांनी कधीतरी लेझीम…”, ‘छावा’चित्रपटावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
Image Of Rajeev Shukla
“काँग्रेस असो वा भाजपा, हा व्यक्ती…” कोल्ड प्लेच्या गायकाबरोबर राजीव शुक्लांचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पूर
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”

संतोष धुरी : आज मी आणि फक्त मीच ज्यांची नेहमीच घेतो.. मुलाखत तेच महाराष्ट्राचे नव्हे जगाचे एक नंबरचे माजी मुख्यमंत्री, ज्यांची ओळख करुन द्यायची गरजच नाही. करोनाच्या काळामध्ये घरात बसून चालवलं. फेसबुकच्या माध्यमातून जे तुमच्या कुटुंबाचे सदस्य झाले. करोनाबरोबर आमची तयारी आहे परंतू करोनाची आमच्याबरोबर राहायची तयारी आहे का? हे वाक्य ज्यांनी अजरामर केलं तेच. महानगरपालिकेचे करोडो रुपये खर्च केले, हजारो कोटी खर्च केले पण खड्डे बुजवले नाहीत. रस्ते चांगले बनवले नाहीत. त्याच साहेबांची आज स्फोटक आणि ज्वलंत मुलाखत सुरु करुया, काय सांगाल.

हे पण वाचा- “बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल मिठी नदीत विझवून…”, भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

संदीप देशपांडे : संजय.. अं… माफ करा.. संतोष, मला घरी बसायला आवडतं, किंबहुना मला खूपच आवडतं. वडिलांना दिलेला शब्द, शिवसेनेचा मुख्यमंत्री, मर्दाची अवलाद, मर्द, दिल्लीश्वर, अफझल खानाच्या फौजा, करोना, मास्क, सुरक्षित अंतर, कोमट पाणी, कपटी, मशाल आणि मी संकटात असलो की मराठी माणूस, थोडं थोडं हिंदुत्व, औरंगजेब, मिंधे गट, गद्दार, खंजीर, खोके मुलाखत संपली, किंबहुना संपलीच.

संतोष धुरी : हीच होती आजची ज्वलंत आणि स्फोटक मुलाखत. असं संतोष धुरी म्हणतात आणि व्हिडीओ संपतो.

आज उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. संजय राऊत यांनी ती मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्यांनी भाजपावर टीका केली. तसंच मला संपवायचं असेल तर संपवा असं आव्हानही त्यांनी भाजपाला दिलं. एकीकडे भाजपाकडून या मुलाखतीवर टीका होत असताना मनसेने हा व्हिडीओ पोस्ट करुन उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

Story img Loader