गेल्या आठवड्यात रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून मोठी हानी झाली. या दरड दुर्घटनेत २७ हून अधिक लोकांच्या बळी गेला. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानीदेखील झाली आहे. खालापूरमधील इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेली इर्शाळवाडी १९ जुलैच्या रात्री दरड कोसळून काळाच्या उदरात गडप झाली. या घटनेुळे संपूर्ण राज्याला मोठा हादरा बसला आहे. या दुर्घटनेनंतर सरकार आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. पावसाळ्याआधीच इर्शाळवाडीसह दरडप्रवण भागांमधील लोकांचं स्थलांतर करायला हवं होतं, अशी टीका विरोधकांकडून सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक ट्वीट करून आताच्या आणि आधीच्या सरकारला धारेवर धरलं आहे. मनसेने केलेल्या ट्वीटनुसार इर्शाळवाडीतल्या ग्रामस्थांनी आठवर्षांपूर्वीच रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून माळीण गावासारखे संकट आमच्यावरही कोसळू शकतं, त्यामुळे आमच्या वाडीचं चौक सर्व्हे क्र. २४ येथे पुनर्वसन करा, अशी मागणी केली होती. परंतु आठ वर्षात यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. परिणामी राज्याला इतक्या मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Chembur Marwari Chawl, citizens vote vidhan sabha boycott, vote boycott, rehabilitation,
मुंबई : दीड हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
Shah Rukh Khan News
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

मनसेने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, धक्कादायक! २५ जून २०१५ रोजी इर्शाळवाडी ग्रामस्थांनी रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवलं होतं की, ‘माळीण गावासारखे संकट आमच्यावरही कोसळू शकतं, त्यामुळे आमच्या वाडीचं चौक सर्व्हे क्र. २४ येथे पुनर्वसन करा. २०१५ साली किंवा त्यानंतर या पत्राची दखल घेतली गेली असती तर आज शेकडो प्राण वाचले असते आणि ग्रामस्थ सुरक्षित नांदले असते. शासन-प्रशासनांनी तत्परता आणि संवेदनशीलता दाखवली नाही तर समाजाला केवढी मोठी किंमत चुकवावी लागते त्याचं हे जीवघेणं उदाहरण!

हे ही वाचा >> राष्ट्रवादीचा दुसरा गट महायुतीत येईल? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकत्र…”

दरम्यान, गेल्या महिन्यात कोकण दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका भाषणात कोकणात पावसाळ्यात दरडी कोसळतील, त्यामुळे प्रशासनाने सजग असावं असा इशारा दिला होता. मनसेने त्यावरही एक ट्वीट केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, ११ जून २०२३ रोजी राज ठाकरे यांनी सांगितलेलं, यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील असं दिसतंय, शासन-प्रशासनाने जागृत राहावं. २० जुलै २०२३ रोजी रायगडच्या इर्शाळवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी आहे.