राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शाब्दिक वाद निर्माण झालाय. अमोट मिटकरी यांनी एक सभेमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केल्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. असं असतानाच आता मनसेच्या प्रवक्त्यांनी मिटकरींवर त्यांच्या एका जुन्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत निशाणा साधलाय. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरवरुन शेअर केलेल्या मिटकरींच्या या भाषणाच्या व्हिडीओला, ‘अमोल मिटकरीचे शरद पवार, उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्याबद्दलचे थोर विचार’, अशी कॅप्शन देण्यात आलीय.

नक्की पाहा >> राष्ट्रवादीचे मिटकरी नेमकं काय म्हणाले ज्यामुळे ब्राह्मण समाजाने संताप व्यक्त करत पुण्यात आंदोलन केलंय; पाहा ‘तो’ Video

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर साधलेले निशाणा…
“जाणते राजे,दादा आणि बेस्ट मुख्यमंत्री यांच्याबद्दल थोर विचार मांडताना,” अशा कॅप्शनसहीत गजानन काळे यांनी मिटकरींचा हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमामध्ये मिटकरी यांनी भाषण देताना विद्यामान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसतंय.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”

उद्धव ठाकरेंवर केली होती टीका
“उद्धव ठाकरे साहेब एकच वाक्य म्हणतायत की शेतकऱ्यासाठी सत्तेला लाथ मारु. मारा ना. लाथ पुरत नसेल तर आम्ही प्लास्टिकचा पाय आणून देतो, मारा ना लाथ,” असा टोला मिटकरींनी या भाषणामध्ये लगावला होता. तसेच पुढे बोलताना, “तुम्ही फक्त बोलता करत काही नाही. याचं कारण म्हणजे शिवसेना हा वाचाळ झालेला पक्ष आहे,” असंही मिटकरी भाषणामध्ये म्हणाले होते.

नक्की वाचा >> “तुमचे दादा, साहेब आणि ताईंना कधीतरी…”; अमोल मिटकरींना मनसेचं खुलं आव्हान

जर शरद पवार प्रमाणिक असते
“काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उतून जाऊ नये. तुम्ही भ्रष्ट होते म्हणून आम्ही भाजपाला (मत) दिलं. तुम्ही बीसीसीआयचे नेते होते की शेतकऱ्यांचे हा आमच्यासमोर प्रश्न आहे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही केलं असतं, जर तुम्ही प्रमाणिक असते आणि प्रमाणिकपणे काम केलं असतं तर आम्हाला आज संभाजी ब्रिगेड स्थापन करायला संधीच मिळाली नसती,” असा टोलाही या भाषणात मिटकरींनी लगावला होता.

तुम्ही म्हणता आम्ही धरणात मुततो
“आम्ही शेतकऱ्याची मुलं. पाणी मागायला आलो तुमच्याकडे तर तुम्ही म्हणता आम्ही धरणात मुततो. धरणात मुतायची मिजास केली म्हणून इथं आम्ही तुमचं राजकारण संपवलं. आता कोणता दादा नाही आणि ताई नाही. तर आपले पदाधिकारी राष्ट्रवादीचं लांगुनचालन करत असतील तर त्यांच्यावर थेट कारवाई करावी,” असं मिटकरी या भाषणात म्हणाले होते.

कोणीही याच्या नेत्याच्याविरोधात बोललं की…
या पूर्वीच्या एका व्हिडीओमध्ये काळे यांनी मिटकरींवर निशाणा साधला होता. “महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एका बाजारु विचारवंताचा उदय झालाय. हॉटेलमधला वेटर माहितीय ना, तो हॉटेलमध्ये गेल्यावर मेन्यूकार्ड पाठ असल्यासरखं बोलतो तशी याने सुरुवात केलीय. कोणीही याच्या नेत्याच्याविरोधात बोललं की हे पाठ आहे का ते पाठ आहे का… अरे काय आहे?,” असं म्हणत काळे यांनी टीका केलेली.

नक्की वाचा >> “…म्हणून राऊतांना राज ठाकरे ‘लवंडे’ म्हणतात”; ‘शरद पवाराला शरम वाटत नाही?’ म्हणणारा बाळासाहेबांचा Video शेअर करत मनसेचा टोला

बाजारु विचारवंत…
“संत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते. तसं काल हा कोणत्यातरी सभेत राज ठाकरे बोलल्यानंतर हनुमान चालीसाचं पठण करत होता. माफ करा मी रेडा आणि या बाजारु विचारवंताची तुलना करु इच्छित नाही,” असंही काळे यांनी टीका करताना म्हटलंय. पुढे बोलताना काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. ‘दादा’, ‘साहेब’ आणि ‘ताई’ असा उल्लेख करत काळे यांनी मिटकरींनी त्यांच्या नेत्यांनाही हनुमान चालीसा पठणासंदर्भात प्रश्न विचारावा असं काळे म्हणाले.

Story img Loader