पक्षात नवचौतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे. ते ‘निष्ठा’ यात्रेच्या माध्यमातून मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना भेटी देणार आहेत. मात्र, आदित्य ठाकरेंच्या ‘निष्ठा’ यात्रेवरून मनसेने शिवसेना आणि संजय राऊत यांना खोचक टोला लगवाला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पक्षाला गळती लागलेली असताना आदित्य ठाकरे यांनी ‘निष्ठा’ यात्रेची घोषणा केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे मुंबईतील शिवसेनेच्या २३६ शाखांना भेट देणार आहेत. यावरून गजानन काळे यांनी ”पक्षातील गळती थांबावी म्हणून छोटे नवाब आता निष्ठा यात्रा काढणार आहेत म्हणे…!” यांना चिमटा आदित्य ठाकरे यांना काढला आहे.

यासोबतच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निषाणा साधला आहे. संजय राऊत यांचा ‘चमत्कार बाबा’ असा उल्लेख करत, ”चमत्कार बाबा संजय राऊत यांना कायमचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवलं तरी यांच्या नवाब सेनेवरील विघ्न टळेल”, असे गजानन काळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – शिवसेनेचं पुन:श्च हरिओम! आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला उद्यापासून सुरुवात, शिवसैनिकांशी संवाद साधणार