महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करून वाद ओढावून घेतला होता. शनिवारी कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोश्यारी यांच्या विधानाचा विविध राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही राज्यपाल कोश्यारींविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करत राज्यपाल कोश्यारी यांची कानउघडणी केली आहे. कोश्यारी नावाचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली.

Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
Sanjay Raut
Sanjay Raut : “महायुतीला जिंकवण्यासाठी पोलीस व गुंडांच्या बैठका”, राऊतांचे आरोप; यादी देण्यास तयार, वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणाले, “सरकार बदलल्यावर…”

हेही वाचा- “शरद पवारांना राग आला तरी ते…” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं विधान

गजानन काळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, राज्यपालांनी सुधारायचं नाही, असं ठरवलेलं दिसतंय. ज्या विषयातलं कळतं नाही. तिथं ज्ञान का पाजळता? ज्यांना नितीन गडकरी किंवा शरद पवारांचा आदर्श घ्यायचा आहे, त्यांनी तो आदर्श घ्यावा. पण छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळात आदर्श होते व आदर्श राहतील. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा.

नेमकं प्रकरण काय आहे?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं.

राज्यपाल काय म्हणाले?

आपल्या भाषणात राज्यपालांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुणाचा आदर्श ठेवावा यासंदर्भात वक्तव्य केलं. “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह