महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची तिसरी यादीही काही वेळापूर्वी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत 32 नावं आहेत. मनसेच्या तिसऱ्या यादीचे वैशिष्ट्य हेच सांगता येईल की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या विरोधातही मनसेने उमेदवार दिला आहे. इतकंच नाही तर तिसऱ्या यादीत पुणे जिल्ह्यातील जवळपास सगळे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मनसेच्या अधिकृत ट्विटरवर अकाऊंटवर ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेने याआधी दोन याद्या जाहीर केल्या. पहिल्या यादीत 27 जणांची नावं होती. तर दुसऱ्या यादीत 45 जणांचा समावेश होता. आता तिसऱ्या यादीत 32 जणांची नावं आहेत. आत्तापर्यंत मनसेने 104 उमेदवार दिले आहेत. मनसे 100 जागा लढवणार असा अंदाज व्यक्त होत होता. तो अगदी अचूक ठरला आहे. मनसेने 104 उमेदवार दिले आहेत. विशेष बाब म्हणजे या यादीतही वरळी मतदारसंघाचा उल्लेख नाही. त्यामुळे राजकाका पुतण्या आदित्य ठाकरेंना मदत करणार हे निश्चित मानलं जातं आहे.

वरळीतून आदित्य ठाकरे यांनी स्वतःला उमेदवारी जाहीर केली. ठाकरे घराण्यातला पहिला ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. अशात राज ठाकरे यांच्या मनसेने वरळीत अजून तरी उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे राजकाकांनी पुतण्या आदित्यला मदत केली आहे हेच निश्चित मानलं जातं आहे.

दरम्यान या यादीमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बाळा नांदगावकर यांचं नाव. बाळा नांदगावकर यांचं नाव तिसऱ्या यादीतही देण्यात आलेलं नाही. त्यामुळे कदाचित ते यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत असं चित्र आहे. बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांचे नाव मनसेच्या यादीत का नाही? अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns third list of candidates for vidhansabha election scj