जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात उपोषणाला बसलेल्या मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह अनेकजण जखमी झाले. यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक व्हिडीओ ट्वीट करत थेट शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनसेने व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “माय-भगिनींच्या रक्तबंबाळ शिरावर भळभळणारी जखम महाराष्ट्राच्या समाजमनावर आता खोलवर रुतली आहे. ही संतापजनक घटना आहे.”

“प्रश्न मिटवायचा होता की चिघळवायचा होता?”

“हा कोणता अमानुषपणा? एखादा प्रश्न हाताळण्याची ही कोणती पद्धत? प्रश्न मिटवायचा होता की चिघळवायचा होता?”; असा प्रश्न मनसेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला विचारला.

व्हिडीओत नेमकं काय?

मनसेने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे, “हे हिंदवी राज्य आहे, इथं आया-बायांची पुजा केली जाते. आंदोलकांना पांगवायचं असेल, तर त्यांच्या कमरेच्या खाली पायावर लाठीने मारायचं असतं, हा पोलिसांचा नियम आहे. मात्र, जालन्यात पोलिसांनी आंदोलकांच्या थेट डोक्यावर मारल्याचं दिसत आहे.”