मशिदींवरचे भोंगे या मुद्द्यावरून सध्या राज्यात विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे आघाडीवर आहेत. आधी अमोल मिटकरी आणि संदीप देशपांडे यांच्यात रंगलेल्या वाकयुद्धानंतर आता धनंजय मुंडे यांच्या टीकेला मनसेकडून खोचक शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची बॉबी डार्लिंग अशा शब्दांत मनसेनं टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मशिदींवरील भोंग्यांवरून आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि संदीप देशपांडे यांच्यात कलगीतुरा रंगला होता. इस्लामपूरच्या सभेत बोलताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा खाज ठाकरे असा उल्लेख केल्यानंतर त्याला मनसेकडून संदीप देशपांडे यांनी मतकरींचा राष्ट्रवादी काँग्रेसची मटण करी असा उल्लेख करत प्रत्युत्तर दिलं. यानंतर आता धनंजय मुंडेंच्या टीकेला मनसे नेते योगेश चिले यांनी उत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंना ‘खाज ठाकरे’ म्हणणाऱ्या अमोल मिटकरींना मनसेचं प्रत्युत्तर; म्हणे, “राष्ट्रवादीच्या गॅसवरील मटण करींनी…!”

राज ठाकरेंचा अर्धवटराव म्हणून उल्लेख!

धनंजय मुंडेंनी इस्लामपूरमध्ये बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. “अर्धवटराव म्हणाले, मला जर कुणाची भीती वाटत असेल, तर ती फक्त शरद पवारांची वाटते. मधल्या काळात यांनी भाजपाच्या इतक्या सीड्या लावल्या, की यांच्यात ईडी घुसली. त्या ईडीचा परिणाम असा झाला, की लाव रे ते सीडी म्हणणारे कुठंय रे ती सीडी म्हणतील”, असं धनंजय मुंडे म्हणाले. “पूर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपाच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपाविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंना ‘अर्धवटराव’ म्हटल्यानंतर मनसेने दिलं उत्तर, म्हणाले “तुमच्यासारख्या तात्या विंचूचा…”

“मुंडेंनी तीन बायका फजिती ऐका चित्रपट पाहावा”

दरम्यान, मुंडेंच्या या टीकेला मनसेकडून योगेश चिले यांनी टीव्ही ९ वर बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. “धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग आहे. राज ठाकरेंवर बोलण्याआधी त्यांनी तीन बायका आणि फजिती ऐका, हा चित्रपट पाहिला पाहिजे. म्हणजे यांना त्यांची लायकी कळेल”, असं चिले म्हणाले आहेत.