महाराष्ट्र केडरच्या २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्याबाबत सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. पुण्यात प्रशिक्षणा दरम्यान खेडकर त्यांच्या विविध मागण्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी व्हिआयपी नंबर, घर, गार्ड, चेंबर मागितल्याने त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. या सर्व प्रकरानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. त्यांनी सादर केलेले अंपगत्वाचं प्रमाणपत्रही संशयास्पद असल्याने त्याचीही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पूजा खेडकर यांचा मॉक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे.या व्हिडीओमध्ये त्यांनी आई-वडील विभक्त झाले असल्याचा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पूजा खेडकर यांचे आई-वडील विभक्त (Pooja Khedkar’s Parents are seperated)

पूजा खेडेकर यांनी झिरो सॅलरी इन्कम असल्याचं अर्जात म्हटलं आहे. त्यामुळे मुलाखतकाराने त्यांना त्यांच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारला. “तुमचे वडील बँकेत कामाला आहेत की कुठे?” त्यावर पूजा म्हणाल्या की, “माझे वडील नागरी सेवेत कार्यरत आहेत.” त्यावर मुलाखतकाराने तत्काळ विचारलं की, “मग झिरो इन्कम कसं काय? त्यावर पूजा म्हणाल्या की, “माझे आई-वडील विभक्त झाले असून मी आईबरोबर राहते. माझा माझ्या वडिलांबरोबर कोणताही संपर्क नाही.”

हेही वाचा >> Pooja Khedkar यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!

दरम्यान, त्यांचा दुसराही मॉक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे. त्या मुलाखतीत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. पूजा (Pooja Khedkar) यांनी मानववंशास्त्राचा अभ्यास केला असून त्या मेडिकल डॉक्टरही आहेत. त्यांनी कौटुंबिक हिंसाचार आणि जेएरॅटिक पेशन्ट याविषयावर त्यांनी अभ्याससंशोधन केलं आहे. तसंच, पानी फाऊंडेशनने घेतलेल्या पाणी साठवण्याच्या स्पर्धेतही त्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या या मुद्द्यांवरूनच त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या मॉक इंटरव्ह्यू व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंटमध्ये काही युजर्सने त्यांच्यावर टीका केली आहे.

“या मॉक इंटरव्ह्यूमध्ये पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना व्यवस्थित उत्तरेही देता आली नाहीत, मग त्यांनी मुख्य इंटरव्ह्यू कसा पास केला असेल?”, असा प्रश्नही एका युजरने विचारला आहे. तसंच, तसंच, काहीजणांनी तिच्या ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रावरूनही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा नागरी सेवेत असातना, आई सरपंच असताना त्यांनी ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणावरून ही परीक्षा कशी काय उत्तीर्ण केली असाही प्रश्न नेटिझन्सने विचारला आहे.

नियुक्तीवर प्रश्नचिन्ह का?

● पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगातून (यूपीएससी) झाली आहे. नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता (मल्टिपल डिसॅबिलिटी) या दोन प्रकारांतून त्यांची निवड झाल्याचे शासनाच्या संकेतस्थळावर दिसून येत आहे.

● नॉन क्रिमिलेयरसाठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे. मात्र, खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता ४० कोटींहून अधिक असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेयरसाठीच्या पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

● खेडकर यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) ‘यूपीएससी’ विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर, ‘यूपीएससी’ने सांगूनही त्या सहा वेळा वैद्याकीय तपासणीसाठी गैरहजर राहिल्या. तरीही त्यांना प्रशासकीय सेवेत कसे घेतले, हा प्रश्न आहे.

● प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचा गृहजिल्हा नोकरीच्या सर्वांत शेवटी मिळतो, असे असूनही खेडकर यांना सुरुवातीलाच पुणे जिल्हा कसा मिळाला, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे.

अनेकदा मिळालेले यश डोक्यात जाते. आपण अधिकाराच्या नाही, तर जबाबदारीच्या खुर्चीवर बसत आहोत आणि ही खुर्ची जनतेच्या सेवेसाठी आहे, याचे भान कोणत्याही अधिकाऱ्याने ठेवणे गरजेचे आहे. या प्रकरणाची तर केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडून सखोल चौकशी झाली पाहिजे.- अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी