सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुतांशी भागात बुधवारी पहाटे मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. शहर व परिसरात २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ग्रामीण भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी ज्वारीसह इतर पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र द्राक्ष बागांसाठी हा पाऊस आणि ढगाळ हवामान हानीकारक असल्याचे मानले जाते.

बार्शी तालुक्यात पाऊस नसला तरी तेथे गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ हवामान जाणवत असल्यामुळे त्या भागातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांवर संकटाची टांगती तलवार आहे. पाऊस पडल्यास सध्या काढणीला आलेल्या सोयाबीन चे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सरलेल्या खरीप  हंगामात ४८ हजार ६८८ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला होता. त्यापैकी सर्वाधिक ३५ हजार ४०८ हेक्टर क्षेत्र एकट्या बार्शी तालुक्यातील आहे. अक्कलकोटमध्ये पाच हजार २४७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली होती. परंतु पावसाने पुरेशी साथ न दिल्यामुळे सोयाबीनची अपेक्षित वाढ झाली नाही. तरीही मोठ्या कष्टाने वाचविलेले सोयाबीन पिकांची काढणी होत असताना पहाटे  पाऊस झाला. त्यात सोयाबीनची हानी झाली.

snails in freshwater pune
पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
issue of air and noise pollution increase in Thane during Diwali
ठाण्यात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत प्रदुषणात घट झाल्याचा पालिकेचा दावा
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
sugar workers salary
कोल्हापूर: पंचवार्षिक पगारवाढ लांबल्याने ऐन दिवाळीत साखर कामगारांची तोंडे कडू
diwali muhurat trading
विश्लेषण: शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? यंदा कधी? त्याचे महत्त्व काय?

हेही वाचा >>>सांगली: अवकाळी पावसाने दैना

गेल्या तीन दिवसांपासून सोलापूर परिसरात ढगाळ वातावरण असताना पहाटे कमीजास्त प्रमाणावर पावसाने हजेरी लावली.काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांचूया गडगडाटासह पाऊस कोसळला. शहरात सकाळ उजाडेपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा आदी तालुक्यांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारीसह रब्बी हंगामातील अन्य पिकांसाठी पोषक ठरणारा असल्याचे मानले जाते. तूर पिकासाठीही हा पाऊस लाभदायक असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊसमानाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती ओढवली असून खरीप पिकांच्या हंगामाला मोठा फाटका बसला आहे. रब्बी हंगामात पेरण्या अपूर्णच आहेत. अनेक भागात पेरलेल्या पिकांची पावसाअभावी उगवण झाली नाही. मात्र आज पडलेल्या पावसामुळे उर्वरीत रब्बी पेरण्या होतील. मंगळवेढा भागात ज्वारीसाठी पोषक हवामान तयार होत असल्यामुळे तेथील शेतकरी आश्वस्थ झाला आहे. पिकांच्या उगवणीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>>वस्रोद्योग अडचणीत असताना कामगारांना १२ टक्के बोनस

तथापि, द्राक्षबागांसाठी आजचा पाऊस आणि ढगाळ हवामान हानीकारक ठरला आहे. द्राक्ष छाटणी झालेल्या बागा सध्या फुलोरा स्वरूपात दिसत आहेत. परंतु पावसाच्या तडाख्यामुळे गळ होऊ शकते. त्यामुळे औषधांच्या फवारणीचा खर्च वाढला आहे.

बाजारपेठांवर पावसाचे सावट

दिवाळी तोंडावर आली असताना बाजारपेठा खरेदीसाठी फुलून गेल्या आहेत. दिवाळी फराळासाठी लागणा-या विविध जिन्नसांपासून कपडे, चप्पल, सौंदर्य प्रसाधने तसेच इलेक्ट्राॕनिक्स उपकरणे, वाहने आदी खरेदीची धामधूम वाढली आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे बाजारपेठांवर पावसाचे सावट पसरले आहे. त्यामुळे व्यापारीही धास्तावला आहे.