केंद्रीय मंत्रिमंडळात नुकतेच मोठे फेरबदल करण्यात आले आहेत, तर काही जुने मंत्र्यांना काढून मोठ्यासंख्येने नव्या चेहऱ्यांना पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली आहे. अनेक मंत्र्यांचे खाते बदल करण्यात आले आहेत. तसेच, नव्या मंत्र्यांना खातेवाटपही झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसच्यवतीने काल(गुरूवार) राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून पेट्रोल, डिझेल, घरगुती स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून मोदी सरकारचा निषेध नोंदवला गेला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर एक विधान केलं. “मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही. तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे” असं ते म्हणाले होते.
नाना पटोलेंच्या या विधानावर आज(शुक्रवार) भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी पलटवार केल्याचे दिसून आले आहे. “ गेल्या २५ वर्षात गांधी घराण्याच्या बाहेरील नेत्यास पक्षाध्यक्ष नेमू न शकलेल्या काँग्रेसने प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या मोदींबाबत न बोललेले बरे. मोदी सोनिया मातोश्रींच्या कृपेने सत्तेवर आलेले नाहीत.” असं भातखळकर ट्विटद्वारे म्हणाले आहेत.
गेल्या २५ वर्षात गांधी घराण्याच्या बाहेरील नेत्यास पक्षाध्यक्ष नेमू न शकलेल्या काँग्रेसने प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या मोदींबाबत न बोललेले बरे. मोदी सोनिया मातोश्रींच्या कृपेने सत्तेवर आलेले नाहीत. pic.twitter.com/hWdP4fq4da
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 9, 2021
तर, “केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही. तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे” असं नाना पटोले काल म्हणाले
“फक्त मंत्री नव्हे तर मोदींनाही बदलण्याची गरज”; नाना पटोलेंचा हल्लाबोल होते.
दरम्यान, महागाई विरोधातील काँग्रेसच्या १० दिवसांच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात आज (शुक्रवार) प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील आंदोलनात आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होणार आहेत.