पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली. या दोघांची तुलना करताना त्यांनी चक्क लघुशंका करणाऱ्या बाप-लेकाचे उदाहरण दिले. चव्हाण यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव य़ेथे काँग्रेसच्या संघर्ष यात्रेच्या सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरच्या कारभारावर त्यांनी सडकून टीका केली. त्यांचा कारभार किती वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करताना त्यांनी आक्षेपार्ह उदाहरण दिले. तसेच मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने लोकांना दरिद्री बनवल्याचा आरोपही त्यांनी केला.

बाप तसा मुलगा याचे उदाहरण देताना चव्हाण म्हणाले, एका गावातल्या शाळेत दुपारी जेवणाच्या सुट्टीत एक खोडकर विद्यार्थी मास्तरांच्या टेबलावर उभा राहून लघुशंका करीत होता. यामुळे चिडलेल्या मास्तरांनी थेट त्या विद्यार्थ्याचे घर गाठले आणि त्याच्या वडिलांनाकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मुलाचे वडिलही घराच्या छतावर उभे राहून लघुशंका करीत असल्याचे त्यांनी पाहिले. देशात आणि राज्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही, असे सांगत त्यांनी भाजपा सरकारवर टीका केली.

Story img Loader