जगात स्वीझरलँड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वीझरलँडचा स्काय वॉक ३९७ मीटर, तर चीनचा स्काय वॉक ३६० मीटरचा आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे. मात्र, चिखलदरा स्कायवॉकच्या बांधकामात काही अडथळे आले. आता हे अडथळे दूर झाले आहेत. राज्याच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या बांधकामाला परवानगी दिलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्राच्या परवानगीमुळे आता चिखलदरा येथील स्काय वॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात नुकतीच याबाबत बैठक झाली होती. तसेच केंद्र शासनाकडून परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनाने पाठपुराव्याची मागणी यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार तात्काळ पाठपुरावा होऊन केंद्र सरकारची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्कायवॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

“आदित्य ठाकरेंनी केंद्राचे अडथळे दूर करण्याचं आश्वासन पूर्ण केलं”

अमरावतीचे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, “केंद्र सरकारने चिखलदरा येथील स्काय वॉकचे अडथळे काढून टाकले आहेत. याबाबत आम्हाला परिपत्रक मिळालं आहे. २ दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्राच्या स्तरावरील अडथळे दूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर आता केंद्र सरकारने यावर प्रतिसाद दिलाय. अमरावतीत स्कायवॉक निर्माण करणं या जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा पर्यटनाचा भाग आहे.”

हेही वाचा : VIDEO: “काय तमाशा लावलाय, तुमचे हे धंदे बंद करा”, अमरावतीत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक

“अमरावतीतील या स्कायवॉकसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून पाठपुरावा होत आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आभार मानते,” असंही यशोमती ठाकूर यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi government give permission to build worlds longest skywalk in amravati pbs