सोलापूर : देशातील शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत असताना त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मोदी सरकारला अजिबात आस्था नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली.  सांगोला येथे शेकापचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पुढाकाराने भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणेशरत्न कृषी महोत्सवाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. त्या वेळी बोलताना त्यांनी भाजप व मोदी सरकारवर शेतकरीविरोधी धोरणे राबवत असल्याचा आरोप केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या वेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांची पत्नी रतनबाई देशमुख, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आदी उपस्थित होते. डॉ. अनिकेत देशमुख यांनी स्वागत केले. या वेळी ‘कृषिनिष्ठ’ शेतकऱ्यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा >>> राज्यातून द्राक्ष निर्यातीला वेग; अनुकूल वातावरणामुळे उच्चांकी निर्यातीचा अंदाज

पवार म्हणाले, की पूर्वी देशात गहू, तांदूळ, साखर, फळफळावळ आदी अनेक प्रकारचे अन्नधान्य परदेशातून आयात करावे लागत होते. परंतु तत्कालीन सरकारच्या प्रयत्नातून देशात अन्नधान्य उत्पादन वाढविण्यात आले. त्यातूनच गहू, साखर, तांदूळ, फळफळावळ अनेक देशांना निर्यात करण्यात देशाने आघाडी घेतली आहे. परंतु मोदी सरकारने त्यात खो घालण्याचे धोरण अंगीकारत शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू केले आहे. कांदा व साखर निर्यातीवर आणलेली बंधने हे त्याचेच द्योतक आहे. कांदा निर्यातीवर ४० टक्के अबकारीशुल्क लादण्यामागे देशात कांदा दर स्थिर राहावा आणि महागाई नियंत्रणात यावी, हा हेतू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु कांदा दर आणि महागाई यांची तुलना करणे पूर्णत: चुकीचे आहे, असे पवार यांनी सुनावले.

मोदींची हमी केवळ चाव्या देण्यापुरती- पटोले

मुंबई : सोलापूर येथील विडी कामगारांसाठीची घरकुल योजना ही डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारची होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी चाव्या देण्यापुरती आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, सोलापुरातील विडी घरकुल योजना ही डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारची होती, या योजनेच्या चाव्या द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत, चाव्या देणे एवढीच मोदी गॅरंटी आहे. यूपीए सरकारच्या काळातील ही योजना पूर्ण करण्यास मोदी सरकारला दहा वर्ष लागली. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा पराभव स्पष्ट दिसत आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार महाराष्ट्रात प्रचाराला यावे लागत आहे, ते पंतप्रधान कमी व प्रचारकच अधिक वाटतात, असा टोलाही त्यांनी लगावला.