देशातील विरोधी पक्षांची काल संयुक्त बैठक बंगळुरूत पार पडली. या बैठकीत २६ पक्षांच्या आघाडीला नाव देण्यात आले. INDIA असं हे नाव असून Indian National Development Inclusive Alliance असा त्याचा पूर्ण अर्थ होतो. मात्र, INDIA वरून भाजपाने टीका केली आहे. हा भारताचा अपमान असल्याचं भाजपानं म्हटलं आहे. यावरून संजय राऊतांनी भाजपावर पलटवार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“नऊ वर्षांत एनडीए आठवली नाही. मित्र पक्ष आठवले नाहीत. परंतु, आम्ही एकत्र आल्यावर त्यांना एनडीए आठवली. याबद्दल एनडीएच्या लोकांनी मोदींचा सत्कारच केला पाहिजे. ही भीती आहे. आम्ही एकत्र आलो आहोत, हा इंडिया आहे. फक्त मोदींनाच वोट फॉर इंडिया बोलण्याचा अधिकार नाही. मोदी इज इंडिया, हा इंडियाचा अपमान नाही का? वारंवार मोदींनी आपल्या भाषणात आम्ही म्हणजे इंडिया आहोत असं म्हटलंय, याचा अर्थ काय होतो? मोदी म्हणजे इंडिया नाही. भाजपा म्हणजे इंडिया नाही. प्रत्येक व्यक्ती हा इंडिया आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “मी गांधींचा भक्त, वाईट पाहत नाही, पण…”; किरीट सोमय्याप्रकरणी संजय राऊतांचा हल्लाबोल

भ्रष्टाचारी लोकांची ही आघाडी असल्याची टीकाही भाजपाकडून करण्यात आली आहे. यावरून संजय राऊत म्हणाले की, “७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा तुमच्या बाजूला उभा आहे. पाठिमागे इक्बाल मिरची उभा आहे. हे ढोंग बंद करा. हे ढोंग लोकांना कळतंय. तुम्ही म्हणजेच इंडिया हे आम्ही मानत नाही. हे नागरिक म्हणजे इंडिया आहे. आम्ही २६ पक्ष एकत्र आल्यावर तुमच्या एनडीएचं कमळ फुलायला लागलं. आम्ही भारत म्हणून, देश म्हणून एकत्र आल्यावर तुम्हाला एनडीए आठवली. हा इंडिया तुमच्या हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. भारत जिंकणार, इंडिया जिंकणार आणि हुकूमशाहीचा पराभव होणार. हिंमत असेल तर भारताचा पराभव करून दाखवा.”

हेही वाचा >> “जैसी करनी…”; किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी संजय राऊत स्पष्टच बोलले

आमच्यावर संस्कार, वाईट पाहत नाही- संजय राऊत

किरीट सोमय्या प्रकरणी आज संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “मी गांधींजीचा भक्त आहे. मी वाईट पाहत नाही. नाही मी वाईट ऐकत. परंतु, वाईटाचा अंत नक्कीच करतो.”

“आमच्यावर संस्कार आहेत. या राज्याची परंपरा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं आहे की कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका. त्यांना पत्नी आहे, मुलं आहेत. त्यांनी कोणतं पाप केलं असेल तर त्यांना भोगावं लागेल. मी का बोलू?” असंही संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi is india then is it not indias insult asked by sanjay raut over nda meeting in delhi sgk
Show comments