सांगली : सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवराज्याभिषेक दिनानिमित मोडी लिपी आणि उर्दू भाषेत शिवचरित्र लिहून ते भित्तिपत्रकाच्या माध्यमातून मांडले आहे. अशा पध्दतीने मोडी आणि उर्दू भाषेत भित्तिपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.

गरवारे कन्या महाविद्यालयात मात्र, इतिहास विभागाच्या वतीने मोडी लिपीतील भित्तिपत्रिका करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो. दरवर्षी महाविद्यालयात शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांचा जीवनपट मोडी लिपीतील भित्तिपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात येतो. प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्रा. डॉ. ऊर्मिला क्षीरसागर, मोडीशिक्षक मानसिंगराव कुमठेकर हे या उपक्रमाचे संयोजन करतात यंदा राज्याभिषेक दिनानिमित्त मोडी आणि उर्दू लिपीतून भित्तिपत्रक करण्याचा संकल्प विद्यार्थिनींनी केला.
विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंची माहिती सांगणारे ३० हून अधिक लेख मोडी लिपी आणि उर्दूमधून लिहिले आहेत. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण, आरमार, त्यांचे भाषाविषयक धोरण अशा विविध विषयावर मोडी आणि उर्दूमध्ये लेख लिहून ते आकर्षकरीत्या मांडण्यात आले आहेत.

Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
itin gadkari on Secularism word meaning
Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”

इतिहासाच्या विद्यार्थिनी जिया बारगीर, अलबिया पीरजादे, नमेरा कुरणे यांनी उर्दूमध्ये तर, वेदश्री जोशी, जान्हवी तानवडे, काजल पांढरे, प्रणाली कांबळे, हर्षदा पुजारी, स्नेहल कांबळे, वैष्णवी संकपाळ, धनश्री आंबले, आर्या खेडेकर, मुस्कान मुजावर, प्रणाली रेडेकर, गिरिजा फडणीस, दिया पाटील, अंजली चोथे, राधिका कांबळे, निलम इंगळे, प्रियांका म्हारगुडे, श्रेया देशमुख, सोनाली पाटील, सानिका कांबळे, डॉ. वैशाली कुलकर्णी, वैष्णवी पिसे या विद्यार्थिनींनी मोडी लिपीतील लेख लिहिले आहेत.

या अभिनव भित्तिपत्रिकेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. नंदिनी काळे, डॉ. ऊर्मिला क्षीरसागर उपस्थित होते. याप्रसंगी मोडी लिपीतील अक्षरांची रांगोळीही रेखाटण्यात आली होती.

Story img Loader