Mohan Bhagwat : लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक वक्तव्य गाजलं होतं. त्या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. आता सरसंघचालक मोहन भागवत यांचाही अंगुलीनिर्देश मोदींकडे तर नाही ना? अशी चर्चा होते आहे. कारण देवत्व लोकांनी ठरवलं पाहिजे असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत मी ईश्वराचं कार्य पूर्ण करण्यासाठी आलो असल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मुलाखतीमध्ये महिला पत्रकाराने “तुम्ही एवढं काम करता तर थकत का नाहीत?” असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना मोदींनी आपला जन्म जैविक प्रक्रियेतून झाला नसल्याचं विधान केलं. “मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे”, असं मोदी म्हणाले होते.

Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Devendra Fadnavis on CM face
Devendra Fadnavis on CM face: “शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचं नाव शिजतंय”, देवेंद्र फडणवींसाचं मोठं विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना..”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Chandrashekhar Bawankule
Maharashtra News : विधानसभेसाठी भाजपाची मोठी योजना; २१ नेत्यांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Ladki Bahin Scheme credit war
Ladki Bahin Scheme: ‘अजित पवार बदलले’, महायुतीमधील घडामोडींवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

माझी आई जिवंत होती तोपर्यंत वाटायचं की…

“माझी आई जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचे की, माझा जन्म झाला असावा. पण आईच्या निधनानंतर मी सर्व अनुभवांना एकत्रित करून पाहतो, तेव्हा मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, परमात्म्यानंच मला पाठवलं आहे. माझ्यातील ऊर्जा ही मानवी शरीरातून मिळालेली नाही. ही ऊर्जा देवानेच मला दिली असून त्यामाध्यमातून त्याला काहीतरी काम करून घ्यायचे आहे. यासाठीच मला सामर्थ्यही प्रदान केले आहे. तसेच मला पुरुषार्थ गाजविण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा देवाकडूनच मिळत आहे. मी काही नाही तर देवाचे साधन आहे. देवाने माझ्या रुपातून काहीतरी काम करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच परिणामांची चिंता न करता मी काम करत जातो” हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्यानंतर आता मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

हे पण वाचा- “मोदींना परमेश्वरानंच पाठवलंय, पण कशासाठी तर…”, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला!

मोहन भागवत यांनी काय म्हटलं आहे?

“मी देव झालो, असे स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या”, अशा शब्दांत येथे आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी उपस्थितांचे ‘बौद्धिक’ घेतले. “क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखे कधी होऊ नये. चमकणे डोक्यात जाते. त्यामुळे वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत, जळत राहावे,’ असा ‘सल्ला’ही त्यांनी दिला.”

पुण्यात आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत यांचं वक्तव्य

पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक कै. शंकर दिनकर तथा भय्याजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. भागवत बोलत होते. प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कोंडविलकर, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव यांच्यासह बांधकाम विकासक नितीन न्याती या वेळी उपस्थित होते. संघाच्या विविध स्वयंसेवक आणि प्रचारकांनी केलेल्या देदीप्यमान कार्याचा गौरव करताना डॉ. भागवत यांनी हा सल्ला दिला.

“देशभक्ती, विविधता ही देशाची बलस्थाने आहेत. देशभक्ती अधूनमधून झोपी जाते. मात्र, चटका बसला, की ती जागृत होते. देश म्हणून आपण एक आहोत, ही भावना महत्त्वाची आहे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन खारीचा वाटा उचलणारे कार्यकर्ते हवे आहेत. अखंडित कार्य करताना ते पणतीसारखे असले पाहिजे. वीज चमकून गेल्यानंतर काही काळ अंधार होतो. पणती मात्र तेवत रहाते. चमकून डोक्यात जाण्यापेक्षा पणती म्हणून तेवत राहावे लागणार आहे” असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा हा सल्ला मोदींना तर नाही ना ? अशी चर्चा सुरु झाली आहे.