चित्रपटाच्या वातावरणनिर्मितीसाठी मल्टिप्लेक्सचालकाचा अभिनव प्रयोग

आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दíशत केलेला अभिनेता हृतिक रोशन याची प्रमुख भूमिका असणारा ‘मोहेंजो दारो’ हा चित्रपट नुकताच प्रदíशत करण्यात आला. प्राचीन भारतीय संस्कृतीवर आधारित हा चित्रपट आणि त्याच्या कथानकाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, चित्रपटाच्या वातावरणनिर्मितीसाठी अलिबाग येथील मल्टिप्लेक्सचालकाने चक्क मोहेंजो दारो शहराची प्रतिकृती साकारून प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे.

चित्रपटाच्या कथानकानुसार मल्टिप्लेक्सची अंतर्गत व बाह्य़  सजावट करण्याचा प्रघात अलिबाग येथील सत्यजित दळी यांनी पाळला आहे. यापूर्वीही ‘बाजीराव मस्तानी’, ‘काकस्पर्श’, ‘कोकणस्थ’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘दिलवाले’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’ यांसारख्या चित्रपटांसाठी कथानकानुसार सजावट करणे आणि कर्मचाऱ्यांची त्यानुसार वेषभूषा उपलब्ध करून देणे ही या चित्रपटगृहाची खासियत राहिली आहे. त्यामुळे आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचíचत मोहेंजो दारो या चित्रपटासाठी या मल्टिप्लेक्समध्ये खास तयारी करण्यात आली आहे.

चित्रपटगृहाच्या बाहेरील भागात चक्क दोन हजार वर्षांपूर्वीचा हडप्पा आणि मोहेंजो दारो शहरांचा देखावा साकारण्यात आला आहे. गेले सहा महिने यासाठी तयारी सुरू होती. मोहेंजो दारो शहरातील इमारती, तेथील संस्कृतीची प्रतीके, येथील मातीकला, मूर्तिकला, चित्रकला, खेळ यांच्या अभ्यास करण्यात आला. यानंतर विटा आणि माती यांचा वापर करून शहरातील देखाव्याची उभारणी करण्यात आली. यासाठी गुजरात आणि राजस्थानमधील पाकिस्तानलगत असणाऱ्या परिसरातून काही वस्तू आणण्यात आल्या. मोहेंजो दारो संस्कृतीशी मिळतेजुळते, मातीपासून बनवलेली चित्रे, देखावे आणि चिन्हे तयार करून घेण्यात आली आहेत. भुज येथील मातीने तयार करण्यात आलेली ही चित्रे आणि चिन्हे विटा आणि माती यांच्या िभतीवर सजवण्यात आली. गोवा आणि राजस्थान येथून सजावटीसाठी मूर्त्यां आणण्यात आल्या आहेत. याशिवाय व्हिएतनाम येथून काही प्राचीन मूर्त्यां आणल्या असून मोहेंजो दारो कालखंडात सापडणाऱ्या नाण्यांच्या प्रतिकृती चित्रपटगृहात आणल्या आहेत. रात्रीच्या वेळी मातीचे दिवे आणि पणत्यांनी या ठिकाणी रोषणाई केली जात असून यामुळे येणाऱ्या प्रेक्षकांना प्राचीन काळात गेल्याचा आभास निर्माण होत आहे.

कथानकानुसार अंतर्गत व बाह्य़ सजावट बदलणारे हे देशातील एकमेव चित्रपटगृह असल्याचे मल्टिप्लेक्सचालक सत्यजित दळी सांगतात. परंपरागत व्यवसायात काळानुरूप बदल करून येणाऱ्या प्रेक्षकांना नवीन आणि काही तरी वेगळे देता यावे, यासाठी हे प्रयत्न केले आहेत. चित्रपटाच्या कथानकानुसार सजावटीसाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या पेहरावासाठी मोठा खर्च आम्ही करतो. मोहेंजो दारोच्या सजावटीसाठी आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केला आहे. पण यातून वेगळं काही तरी केल्याचा जो आंनद मिळतो तो किती तरी मोठा आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना आम्ही लवकरच या सजावटीचे फोटो पाठवणार आहोत, असेही दळी म्हणाले.

Story img Loader