शिवसेना खासदार संजय राऊत मागील जवळपास १०० दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती. आज अखेर त्यांना जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास संजय राऊतांची ऑर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊतांची तुरुंगातून सुटका होताच, शेकडो शिवसैनिकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आहे. काही कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीसह विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे.

हेही वाचा- संजय राऊतांना जामीन मंजूर; दीपक केसरकरांनी दिल्या सदिच्छा, म्हणाले…

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी सूचक ट्वीट केलं आहे. “लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा…” असं ट्वीट कंबोज यांनी केलं आहे. संजय राऊतांची सुटका झाल्यानंतर कंबोज यांनी हे ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

संजय राऊतांना जामीन मिळाला पण…” – सुधीर मुनगंटीवार
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही संजय राऊतांच्य जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांना जामीन मिळाला आहे, पण त्यांची निर्दोष मुक्तता झाली नाही, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली.

हेही वाचा- तुरुंगाबाहेर येताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

संजय राऊतांच्या जामिनावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “भारतीय जनता पार्टी किंवा एखादा राजकीय पक्ष म्हणून या घटनेकडे एका विशिष्ट नजरेतून बघण्याची आवश्यकता नाही. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. एखादा राजकीय नेता असो वा एखादा सामान्य गुन्हेगार असो, जेव्हा त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं जातं, त्यानंतर विशिष्ट कालावधीने त्याला जामीन मंजूर केला जातो. त्यामुळे संजय राऊतांना जामीन मिळण्यावर भाष्य करण्यासारखं काहीही नाही. त्यांची जेव्हा निर्दोष मुक्तता होईल, तेव्हा यावर प्रतिक्रिया देता येईल. आताच यावर प्रतिक्रिया देणं जरा घाईचं ठरेल, असंही मुनगंटीवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohit kamboj tweet after sanjay raut released from jail viral tweet rmm