Mohol Constituency Politics : मोठी बातमी! शरद पवारांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलला; सिद्धी कदम यांच्याऐवजी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Mohol Vidhan Sabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) मोहोळ मतदारसंघात उमेदवार बदलला आहे.

Mohol Constituency Politics
शरद पवारांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलला, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Mohol Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस बाकी असल्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु आहे. मात्र, अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा एक दिवस बाकी असतानाच काही ठिकाणी मोठ्या घडामोडी घडत असून उमेदवार बदलले जात आहेत. यामध्ये काँग्रेसने कोल्हापूरमध्ये उमेदवार बदलला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) मोहोळ मतदारसंघात उमेदवार बदलला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सिद्धी रमेश कदम ((Siddhi Kadam)) यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करत त्यांच्या ऐवजी मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मोहोळ (Mohol Constituency) तालुक्यातील काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सिद्धी कदम यांच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर मोहोळमध्ये उमेदवार बदलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांगितली जात आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; कारवाईचं कारण काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shaina NC vs Atul Shah
Shaina NC vs Atul Shah: ‘निवडणूक म्हणजे संगीत खुर्ची आहे का?’, शायना एनसींना उमेदवारी मिळताच भाजपाचे ज्येष्ठ नेत्याचे बंड; अपक्ष उमेदवारी दाखल करणार
devendra fadnavis marathi news
“महाराष्ट्रात आम्ही अतिआत्मविश्वासात होतो”, देवेंद्र फडणवीसांनी केलं मान्य; ‘या’ दोन कारणांचा केला उल्लेख!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : Uddhav Thackeray : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; कारवाईचं कारण काय?

मोहोळमध्ये कोणाला दिली उमेदवारी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या कन्या सिद्धी कदम यांना मोहोळमधून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत सिद्धी कदम यांची उमेदवारी अचानक रद्द करत मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अचानक उमेदवारी बदलण्यात आल्यामुळे मोहोळच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबरोबरच जयंत पाटील यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र देत सिद्धी रमेश कदम यांच्या नावे देण्यात आलेला पक्षाचा एबी फॉर्म रद्द समजण्यात यावा, असं पत्र देण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द का केली?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून सिद्धी कदम यांना मोहोळमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) स्थानिक पदाधिकाऱ्यांसह महाविकास आगाडीच्याही काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. तसेच या पदाधिकाऱ्यांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सिद्धी कदम यांची उमेदवारी अर्ज रद्द करत त्यांच्या ऐवजी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mohol constituency vidhan sabha elections 2024 siddhi ramesh kadam candidature canceled raju khares candidature declared in ncp sharad pawar group gkt

First published on: 29-10-2024 at 09:45 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या