पनवेल रेल्वे स्थानकामधील स्टेशन मास्तर या पदावर काम करणारे डी. के. गुप्ता यांच्यावर स्थानकात सफाईचे काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याबद्दल शनिवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यीच माहिती पनवेल लोहमार्ग पोलिसांनी दिली. गुप्ता यांनी पाच दिवसांपूर्वी या महिलेशी दुपारी अडीच वाजता अश्लील चाळे केले. भीतीमुळे पीडित महिलेने या प्रकाराची वाच्यता कुठे केली नाही. मात्र शनिवारी तिने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.

दरम्यान अद्यापपर्यंत गुप्ता यांना अटक झालेली नाही. या घटनेबद्दल पोलीसांनी मौन बाळगले आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश किर्दत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही.

Story img Loader