राज्यात गाजलेल्या येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार संशयित संजय बोरसे उर्फ थरथऱ्या (५०,रा. मोहाडी) याने बुधवारी गुजरातमधील दिंढोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कगुवा येथे गळफास घेतला. बोरसेची माहिती सांगणाऱ्यास पोलिसांनी पाच हजार रूपयाचे बक्षिस जाहीर केले होते.नगावबारी परिसरात बेबीबाई चौधरी ही कुंटणखाना चालविते. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी चौधरीसह इतरांविरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रारंभी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात बोरसेचाही समावेश होता. गुन्हा दाखल झाल्यापासून बोरसे फरार होता. सुरतजवळील दिंढोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कगुवा येथे नातेवाईकांकडे त्याने आश्रय घेतला होता. त्याचे नातेवाईक परशुराम पाटील हे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. त्याच इमारतीच्या लिफ्टच्या खोलीत बोरसेने गळफास घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा