दापोलीतील बहुचíचत पशाचा पाऊस प्रकरणातील संशयित आरोपी संगीता नार्वेकर हिला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली असून दापोली न्यायालयाने तिला २८ फेब्रुवारीपर्यंत सात दिवसांची कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन-तीन दिवसांतच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील, असा विश्वास दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले.
नग्नपूजेद्वारे पशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवल्याप्रकरणी बुरोंडी येथील युवतीने संगीता नार्वेकर हिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे ही तक्रार करण्यासाठी तिने सबळ पुरावा म्हणून मोबाइल ध्वनिफीतही पोलिसांना सादर केली. पण काही तांत्रिक कारणामुळे तिला अटक करणे शक्य होत नव्हते. दरम्यान, ही तक्रार झाल्यानंतर नार्वेकर मुंबईत गेल्याचे पोलिसांना समजले. तिचा माग काढून तिला दापोली पोलिसांसमोर हजर करण्यात आले आणि तिची चौकशी करण्यात आली. त्यांनतर  तांत्रिक कारणाने थांबलेली तिच्यावरील कारवाई पूर्ण करण्यात आली.

Story img Loader