नागपूरमध्ये विधानभवनासमोर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. महापालिकेने पुन्हा सेवेत घ्यावे, अशी त्याची मागणी होती. प्रकाश बर्डे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून आत्मदहन करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर महापालिकेतील १७ सफाई कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, महापालिकेने अजूनही त्यांना सेवेत घेतलेले नव्हते. या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी यातील प्रकाश बर्डे हा कर्मचारी बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास नागपूरमध्ये विधानभवनासमोर आला. विधान भवनाच्या आवारात आत्मदहन करण्याचा बर्डे यांचा प्रयत्न होता. मात्र,  पोलिसांनी बर्डे यांना वेळीच रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सध्या पोलिसांनी बर्डे यांना ताब्यात घेतले आहे.