परतीच्या पावसाकडून निराशा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जवळपास चार महिने मुक्काम केलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने आता राज्यातून निरोप घेतल्याचे हवामान विभागाने शनिवारी (६ ऑक्टोबर) जाहीर केले. यंदाच्या  हंगामात ८ जून रोजी मोसमी पाऊस राज्यात दाखल झाला होता. हंगामामध्ये चांगला पाऊस न झालेल्या भागांना परतीच्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, त्याबाबत निराशाच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

केरळनंतर महाराष्ट्रामध्ये ८ जूनला मोसमी वारे दाखल झाले होते. २३ जूनला मोसमी पावसाने संपूर्ण राज्य व्यापले होते. त्यानंतर २९ जूनला देशभर पोहोचलेल्या मोसमी पावसाने राजस्थानमध्ये सुमारे तीन महिने मुक्काम केला. देशात सरासरीच्या तुलनेत ९१ टक्के पाऊस झाला. राज्यात १ जून ते ३० सप्टेंबर या मोसमी पावसाच्या हंगामामध्ये नंदूरबार, धुळे, जळगाव , औरंगाबाद , जालना, बुलडाणा, नगर, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला. पोषक स्थिती निर्माण न झाल्याने परतीच्या पावसानेही निराशा केली. त्यामुळे या भागात दुष्काळाचे सावट आहे.

राजस्थानमधून मोसमी पावसाने २९ सप्टेंबरला परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर देशाच्या बहुतांश भागातून तो माघारी फिरला. शुक्रवारी (५ ऑक्टोबर) निम्म्याहून अधिक महाराष्ट्रातून तो माघारी फिरला होता. सद्यस्थितीत संपूर्ण राज्यातून मोसमी पाऊस परतला आहे. ८ ऑक्टोबपर्यंत संपूर्ण देशातून तो निरोप घेईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

केरळ, तमिळनाडूत अतिवृष्टीचा इशारा

महाराष्ट्रातून मोसमी पाऊस परतला असला, तरी नैर्ऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणि वादळ कार्यरत असल्याने केरळ, तमिळनाडू, लक्षद्वीप आदी भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस समुद्रही खवळलेला असणार आहे. त्यामुळे  खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याबरोबरच समुद्रात गेलेल्यांनी तटबंदीकडे परत येण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.