भिंवडीत बागेश्वर धाम सरकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. देशातील नागरिकांना वेळीच जाग आली नाही तर, भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्यावर एक दिवस चंद्र दिसेल, असे कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. कपिल पाटील यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
कपिल पाटील म्हणाले, “महाराजांनी सनातन धर्माचे महत्व सांगितले आहे. भारत हा सनातन धर्मामुळेच आकारला गेला आहे. पण, मी धर्म किंवा राजकारणाबाबत बोलणार नाही. जातपात, धर्म आणि पंथ यापेक्षा माणुसकीचा धर्म हा सर्वोच्च आहे.”
हेही वाचा : ५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार?; शिंदे गटाचा मोठा निर्णय!
“भारतातील नागरिकांना वेळीच जाग आली तर चांगली गोष्ट आहे. मात्र, वेळेत जाग आली नाही तर एक दिवस तिरंगा राष्ट्रध्वजावर चंद्र दिसेल. आपल्या वेळेत जाग आली तर तिरंगा चंद्रावर डौलाने फडकेल,” असेही कपिल पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा : नितीन गडकरींकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं जाहीरपणे कौतुक, म्हणाले “आपण त्यांचे ऋणी, त्यांच्यामुळेच…”
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या याद्या लोकसभा आणि महापालिका निवडणुकीला वापरल्या जातात. मतदारांचे सतत ठिकाण बदलत असल्याने त्यांची नावे वेगळ्या यादीत जातात. त्यामुळे या याद्या बदलून नव्याने याद्या बनविल्या पाहिजेत. महापालिकेच्या याद्या प्रभागानुसार अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्देश द्यावेत, अशी मागणी कपिल पाटील यांनी सोमवारी केली आहे.