राज्यातील करोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याचे दिसत आहे. कारण, दैनंदिन रूग्ण संख्या ही मोठ्याप्रमाणार आढळून येत आहे. शिवाय, ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. आज दिवसभरात राज्यात १२ हजार १६० नवीन करोनाबाधित आढळले, तर ओमायक्रॉनचे ६८ रूग्ण आढळून आले. याचबरोबर ११ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.
तसेच, राज्यात आज १ हजार ७४८ रुग्ण करोनामुक्तही झाले असून, आजपर्यंत एकूण ६५,१४,३५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज रोजी एकूण ५२,४२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,१२,०२८ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १४१५५३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९३,७०,०९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,१२,०२८ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,३२,६१० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –
आज राज्यात ६८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३४ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३४ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत.
रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
मुंबई – ४०, पुणे मनपा -१४, नागपूर, – ४, पुणे ग्रामीण आणि पनवेल- प्रत्येकी ३, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा १
आजपर्यंत राज्यात एकूण ५७८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.